Entertainment Travel 

भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे

Share This Post

आपल्यापैकी प्रत्येकाला मुंबईतील कडक उन्हापासून कुठेतरी दूर जावं असं वाटत असतं. बहुतेक वेळा सगळ्यांनाच एकत्र सुट्टी लागल्याने उत्तम हवामान असलेली प्रेक्षणीय घरच्यांना खुणावू लागतात. सुट्टीमध्ये मस्तपैकी फिरायला जाण्याची सर्वांनाच इच्छा असते. पण ऑफिसमधून मिळालेल्या मोजक्या दिवसाच्या सुट्टीत आणि कमी बजेटमध्ये नेमकं कुठे जायचं हा प्रश्न फार मोठा असतो. खरंतर कुटुंबासोबत काही दिवस बाहेरगावी गेल्याने सर्वांनाच ताजेतवाने वाटतं. जर तुम्हाला मनापासून भटकंती करायची असेल तर थोडीशी तडजोड करण्याची तयारी ठेवा. कारण काही सोयीसुविधांबाबत तडजोड केल्यास तुम्हाला भारतातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणं पाहता येऊ शकतात. यासाठीच कमीत कमी पैशांमध्ये भारतात नेमके कुठे कुठे जाता येईल याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. ही भारतातील अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही अगदी दहा ते पंधरा हजाराच्या बजेटमध्ये जाऊ शकता. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील तुम्हाला भारतातील निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद लुटता येऊ शकतो. या बजेटमध्ये येण्या-जाण्याचा खर्च समाविष्ठ केलेला नाही. कारण तुम्ही येण्या-जाण्यासाठी कोणता मार्ग आणि कोणता पर्याय निवडता यावर तो खर्च अवलंबून आहे. जर तुम्ही यासाठी रेल्वे अथवा विमानाचे आधीच बुकींग केले तर तुमचा खर्च वाढणार नाही हे मात्र खरं. त्यामुळे येण्या-जाण्यासाठी तुमच्या बजेटनुसार साधने आणि मार्ग निवडा आणि भारतातील या अप्रतिम पर्यटन स्थळांना भेट द्या.

 

१) पॉडेंचरी

 

पॉंडेचरी हे ठिकाण फ्रेंच आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळी राहण्याचा खर्च जास्त नक्कीच नाही. कारण पॉंडेचरीमध्ये असे अनेक आश्रम आहेत. जिथे तुम्ही अगदी कमी खर्चात राहू शकता. त्यामुळे या ठिकाणी अगदी दहा हजारांमध्येही तुम्ही दोन-चार दिवस तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच राहू शकता. पॉंडेचरीमधील शांतता आणि स्वच्छता तुम्हाला एखाद्या फ्रेंच सिटीत गेल्याचा अनुभव देऊ शकते. त्यामुळे या सुट्टीत बॅग उचला आणि पॉंडेचरीला जाण्याचा बेत आखा.

 

 

२) मॅकलॉडगंज

हिमाचलप्रदेशला निसर्गाने खास सौंदर्य बहाल केलं आहे. मॅकलॉडगंड हिमाचल प्रदेशच्या उंचच उंच पर्वत रांगांमध्ये वसलेलं आहे. निसर्गसौंदर्यासोबतच प्राचीन मंदिरे, थंड पाण्याचे झरे आणि ट्रेकिंग ही इथली खासित आहे. यासोबत या ठिकाणी भेट देणं फार खर्चिक मुळीच नाही. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दहा हजाराच्या बजेटमध्ये अगदी मजेत दोन ते चार दिवस या ठिकाणी  राहू शकता. येथील भाग्शू फॉल्स, शिवा कॅफे, नाइट कॅंपिग आणि त्रिउंट ट्रेकिंग लोकप्रिय आहेत.

 

 

३) गोवा

जर तुम्हाला अगदी कमी खर्चात फिरायला जायचे असेल तर गोवादेखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. गोव्यात अत्यंत कमी दरात तुम्हाला होम स्टे अथवा हॉटेलची सोय उपलब्ध होऊ शकते. शिवाय गोव्यात फिरण्यासाठी स्कुटर अथवा गाडी भाड्याने मिळते. ज्यामुळे दोन ते चार दिवस समुद्रकिनारी मुलांसोबत तुम्ही नक्कीच सुटीचा आनंद घेऊ शकता. शिवाय गोव्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे अगदी कमी बजेटमध्ये तुमची एक छान ट्रिप होऊ शकते.

 

 

४) कॅसोल

हिमाचल प्रदेशमधील या छोटयाशा गावाला मिनी इजरायली असं देखील म्हणतात. कॅसोलमध्ये उंच डोंगरांवर ट्रेकिंग करण्याची संधी तुम्हाला मिळू शकत. इथल्या पार्वती वॅली, तोष घाटीमध्ये सायंकाळी फिरण्याचा आनंद सुखद असू शकतो. शिवाय या ठिकाणी खीरगंगा येथील गरम पाण्याचे झरे आणि पांडव मंदिर प्रसिद्ध आहेत. अगदी कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला जरूर भेट द्या.

 

५) लेंसडाऊन

 

लेंसडाऊन हे उत्तराखंडमधील एक सुंदर हिलस्टेशन आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हे शहर तुमच्या मनाला नक्कीच भुरळ घालू शकतं. बर्फाच्छित पर्वतरांगा, प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी हे शहर अगदी उत्तम आहे. या ठिकाणी वॉर मेमोरिअल, टिप इन टॉप पॉईंट,भुल्ला ताल, कालागढ वाईल्ड सेंचुरीला भेट देऊ शकता. त्यामुळे अगदी स्वस्तात विकएंड घालवण्यासाठी हे हिलस्टेशन अगदी मस्त आहे.

 

६) वृंदावन

 

भगवान कृष्णाचं जन्मस्थान असल्याने वृंदावन लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही धार्मिक वृत्तीचे असाल तर कुंटुबासोबत जाण्यासाठी हे ठिकाणी अगदी छान आहे. अगदी स्वस्तात ट्रस्टच्या रूम्स मिळू शकतात. या ठिकाणी प्रार्थना आणि नामस्मरणामुळे तुम्हाला नेहमीच्या धावपळीतून दूर मन शांत करणारा अनुभव मिळू शकतो. इथली विलक्षण शांतता आणि अध्यात्मिक वातावरण तुम्हाला नक्कीच भारावून टाकेल.

 

७) आग्रा

जगातील सात आश्चर्यापैकी एक ताजमहल पाहण्याची इच्छा असेल तर आग्राला जरूर भेट द्या. या ठिकाणी एक ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. आग्रात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे रोजच्या धकाधकीपासून दूर कमी बजेटमध्ये फिरायला जाण्यासाठी आग्रा एक उत्तम पर्याय असू शकेल.

 

८) वाराणसी

वाराणसी जगातील एक प्राचीन शहर असून ते भदवान शंकराची भूमी या नावाने प्रसिद्ध आहे. असं म्हणतात या ठिकाणी येणाऱ्यांना पुण्याची प्राप्ती होते. काशी विश्वनाथाचे मंदिर, गंगाघाट अशी अनेक धार्मिक स्थळं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शिवाय या ठिकाणी राहणं मुळीच खर्चिक नाही.

९) कन्याकुमारी

दक्षिण भारतातील कन्याकुमारी हे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. या ठिकाणी तिन समुद्रांचा संगम झालेला आहे. विवेकांनंद रॉक मेमोरिअलवरदेखील तुम्हाला निसर्गाच्या पंचमहाभूतांचा अनोखा अनुभव घेता येऊ शकतो. भारतात कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी कन्याकुमारी एक मस्त पर्याय आहे. थोडं जास्तीचं बजेट आणि सुट्टी असेल तर कन्याकुमारीहून तुम्ही केरळमध्ये जाण्याचा विचारदेखील करू शकता. नाहीतर एक ते दोन दिवसासांठी कन्याकुमारीला कमी पैशात फिरण्याचा आनंद लुटा.

 

१०) ऋषीकेश

जर तुमच्याकडे फिरण्यासाठी तीन-चार दिवस असतील तर तुम्ही ऋषीकेशला अवश्य जा. हरिद्वार, डेहराडून आणि मसुरी असे तुम्ही या दिवसात फिरू शकता. धार्मिक स्थळांमुळे तुम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी कमी पैशात आणि सहज सोय होऊ शकते.

 

१२) हम्पी

कर्नाटकमधील हम्पीदेखील सुट्टीत जाण्यासाठी एक चांगले पर्यटन स्थळ असू शकते. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ जुनी स्मारके, मंदिरे यांनी समृद्ध आहे. या ठिकाणी स्वस्त दरात हॉटेल्स उपलब्ध असल्यामुळे कुटुंबासोबत दोन ते तीन दिवस या शहरात राहण्यासाठी तुम्हाला दहा हजारांपेक्षा कमी  येऊ शकते.

 

१३) माउंट अबू

उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्यासाठी राजस्थानमधील हे एकमेव हिलस्टेशन तुम्हाला नक्कीच खुणावू शकते. माउंट अबूमधील वातावरण नेहमीच मनमोहक असते. या ठिकाणी डोंगरदऱ्या आणि दिलवाडा मंदिर आणि त्याची रचना तुम्हाला नक्कीच आवडेल. कुंटुंबासोबत कमी बजेटमध्ये एक ते दोन  दिवस तुम्ही माऊंट अबूमध्ये आरामात राहू शकता. जर तुमचं बजेट दहा हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता.

 

१४) मनाली

हिमालयातील डोंगररांगामध्ये फिरणं तसं फार महाग मुळीच नाही मात्र जर तुम्हाला थोडी लॅव्हिश ट्रिप हवी असेल तर हिमाचलच्या मनालीला भेट द्या. थोडं बजेट वाढू शकतं. मात्र मुंबईच्या उकाड्यातून जरा दूर थंडगार विश्रांती घेण्यासाठी  मनाली अगदी परफेक्ट आहे

१५) गंगटोक

हिमालयाच्या पर्वतरांगा भटकण्यासाठी या सुट्टीत सिक्कीमची राजधानी गंगटोकला जरूर जा. गंगटोकचे तलाव, धबधबे तुमच्या मनाला प्रसन्न करतील गंगटोकमध्ये तुम्ही मनसोक्त शॉपिंगदेखील करू शकता. शिवाय गंगटोक पर्यटन तुमच्या बजेटमध्ये देखील आहे.

 

आम्ही सुचवलेल्या या पर्यटन स्थळांपैकी प्रत्येक राज्यातील विविध पर्यटन स्थळांची एक वेगळी विशेषता आहे. भारत सफरीच्यावेळी यापैकी कोण कोणत्या पर्यटन स्थळाला तुम्ही आवर्जून भेट दिली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.

 

 

 

 

 

Related posts