श्रीनगरमधील पर्यटन स्थळे.
श्रीनगर ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी व राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. श्रीनगर शहर काश्मीर खोऱ्यात झेलम नदीच्या काठावर वसले असून ते जम्मूच्या २५० किमी उत्तरेस व दिल्लीच्या सुमारे ८०० किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली श्रीनगरची लोकसंख्या सुमारे १२ लाख होती. श्रीनगर ऐतिहासिक काळापासून येथील रम्य हवामान, अनेक सरोवरे इत्यादींसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ राहिले आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला श्रीनगरमधील पाच प्रमुख स्थळांविषयी माहिती देणार आहोत. श्रीनगर पर्यटन करताना तुम्ही या पाच पर्यटन ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे. १) निशात बाग निशात बाग हे जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. श्रीनगरच्या मोगल गार्डनमधील निशात बाग ही सर्वात…
Read More