Entertainment T.V Serials 

महामानवाचा महासोहळा – जयजयकार क्रांतिसूर्याचा! ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा सोनी मराठी वाहिनीवर.

Share This Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त महासोहळा साजरा कारण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवर ‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आनंद शिंदे, आदर्श शिंदे असे दिग्गज कलाकार क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुतिकवने गाणार आहेत. बाबासाहेबांवरील या कार्यक्रमात प्रेक्षकांना पोवाडा, कव्वाली आणि पाळणा हे पाहायला मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेद्वारे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचलेला अभिनेता सागर देशमुख या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नक्की पाहा, ‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Entertainment T.V Serials 

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका – दीक्षा केतकर साकारणार मुख्य भूमिका!

Share This Post

सोनी मराठी वाहिनी नेहमीच नव्या धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. अशीच एक नवी मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचा. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत. या प्रोमोमध्ये दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहे. या नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी  प्रेक्षक  उत्सुक आहेत. वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी  होते, हे  पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Read More