नवरात्री दिवस ०७ : दैत्यांचा संहार करून भक्तांचे रक्षण करणार्या कालरात्री देवीचा नवरात्रातील अनोखा महिमा
नवरात्री स्पेशल: सप्तमी – रंग हिरवा एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।। वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा। वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।। काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो कां? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत:…
Read More