Bollywood Entertainment 

May 1 is a jolly ‘day .

Share This Post

मराठी चित्रपट सृष्टी आणि विनोदी संहिता हे समीकरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजनाची पर्वणी ठरली आहे. अशीच एक मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे ‘झोलझाल’. युक्ती इंटरनेशनल यांचा आगामी ‘झोलझाल’ हा सिनेमा प्रेक्षकांना तुफान हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला होता. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मानस कुमार दास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरवरून ही धमाल कॉमेडी एका आलिशान महालाच्या अवतीभोवती घडत आहे की काय? असा संदर्भ लागत असतांनाच, पोस्टरमध्ये…

Read More