Entertainment T.V Serials 

आई माझी काळुबाई मालिकेत आर्याची भूमिका साकारणार रश्मी अनपट

Share This Post

मराठी मालिकाविश्वातील लोभस चेहर्‍याची गोड अभिनेत्री म्हणून रश्मी अनपट हे नाव डोळ्यासमोर येतं.  रश्मी आता सोनी मराठी वाहिनीवरच्या अफाट लोकप्रियता लाभलेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत ‘आर्या’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे. भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही रश्मीच्या अभिनयाची खासियत. पुण्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना झालेले नाट्यसंस्कार आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘स्वभावाला औषध नाही’, ‘गाठीभेटी’ या नाटकांतल्या लक्षवेधी भूमिकांमुळे तिच्या अभिनयाचा पाया भक्कम झाला आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक भूमिकेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असते. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत सध्या विराटच्या आसुरी प्रभावाखाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले  पुरोहित  कुटुंब यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला  आहे. या महतत्त्वाच्या  टप्प्यावर  रश्मीने साकारलेली आर्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असेल. लोकप्रिय युवा अभिनेता  विवेक सांगळे याच्याबरोबर अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे  या दमदार अभिनयसंपन्न कलाकारांबरोबर रश्मीचे ‘आर्या’ साकारणे हे या मालिकेचे वेगळेपण ठरेल. मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता, 29 मार्च ते 3 एप्रिल  हा सप्ताह एका तासाच्या विशेष भागांचा असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, ‘आई माझी काळुबाई’. सोम.-शनि., संध्या. 6:30  वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Entertainment T.V Serials 

२२ मार्चपासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर ‘सप्तपदी मी रोज चालते’ स्वप्ना वाघमारे-जोशी ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रोजेक्ट हेड!

Share This Post

आजवर विविध आशयघन चित्रपट – कार्यक्रमांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारी ‘फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या ‘साईबाबा श्रद्धा आणि सबूरी’ या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. ‘फक्त मराठी वाहिनी’ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत ‘सप्तपदी मी रोज चालते’ असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका येत्या सोमवार, २२ मार्चपासून रात्रौ ८ :३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर आणली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात विशेष लौकिक…

Read More