Bollywood Entertainment 

Mangesh desai will build burj khalifa

Share This Post

मंगेश देसाई मराठी चित्रपटसृष्टीतले एक चतुरस्त्र अभिनेते आहेत. मंगेश देसाई नेहमीच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारे मंगेश लवकरच ‘झोलझाल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘प्रेम दिक्षित’ या बिल्डरची भूमिका मंगेश या सिनेमात साकारत आहेत. हा बिल्डर त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. विनोदी अंग असलेली ही खलनायकी भूमिका मंगेश या सिनेमात साकारत आहेत. या सिनेमातल्या प्रेम दिक्षित या बिल्डरला त्याचे एक स्वप्न पूर्ण करायचे असतो. दुबईत बांधण्यात आलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत म्हणून…

Read More
Entertainment 

ZOL ZAAL – लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘झोल झाल

Share This Post

मराठी सिनेसृष्टीत अनेक मजेदार, विनोदी चित्रपट येत आहेत. यात आणखी भर टाकत, पुढील वर्षात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘झोल झाल’ नावाचा एक धमाल चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. खरे तर या चित्रपटाच्या नावातच सारे काही सामावले आहे. चित्रपटाच्या नावावरून हा सगळा खटाटोप पोस्टरवर दिसणाऱ्या महालासाठी असणार, असे प्रथमदर्शी तरी दिसतेय. असे असले तरीही हा झोल काय असणार, हे मात्र चित्रपट आल्यावरच कळेल. युक्ती इंटरनॅशनल प्रस्तुत ‘झोल झाल’ या चित्रपटाचे निर्माता गोपाळ अग्रवाल आणि आनंद गुप्ता असून चित्रपटाच्या सहनिर्मात्यांची धुरा सारिका ए. गुप्ता, संजना जी. अग्रवाल यांनी…

Read More