Entertainment T.V Serials 

कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या नोंदणीला मिळाला उदंड प्रतिसाद!

Share This Post

सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  नोंदणी सुरू झाली आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची आणि आपलं नशीब अजमावायची संधी हा कार्यक्रम सामान्यजनांसाठी घेऊन आला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये म्हटल्याप्रमाणे मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल ठरणार आहे. कारण फक्त एक मिस्ड कॉल देऊन प्रेक्षक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करू शकतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या चार दिवसांतच गेल्या  पर्वातल्या  प्रवेशांचा उच्चांक मोडला आहे. आत्तापर्यंत नोंदणीसाठी मिळालेला प्रतिसाद बघता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाबद्दलचे औत्सुक्य दिसून येते आहे. जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तर तुम्ही त्या जोरावर हॉटसीटवर बसू शकता आणि करोडपतीही होऊ शकता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेता सचिन खेडेकर करणार आहे. यंदाचं पर्व कसं वेगळं असेल, हे पाहणं सगळ्यांसाठीच उत्सुकतेचं असणार आहे.

Read More