भाऊबीज; बहिण-भावाचे नाते जपण्याचा दिवस
दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।’ असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला…
Read More