‘रंग प्रीतीचा बावरा’ गाण्याने बहरणार प्रेमाचा अंकुर
सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ हा सिनेमा १६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, कलाकार समोर आल्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे या मुख्य जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे तर संजय नवगिरे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘रंग प्रीतीचा बावरा’ या रोमँटिक गाण्याला जसराज जोशी यांच्या सुमधुर आवाजाने चारचाँद लागले आहेत…
Read More