Entertainment Lifestyle 

भाऊबीज; बहिण-भावाचे नाते जपण्याचा दिवस

Share This Post

दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।’ असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला…

Read More
Entertainment Lifestyle 

धनत्रयोदशी का साजरी करतात?

Share This Post

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो…

Read More