Entertainment 

‘फक्त मराठी वाहिनी’च्या ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!

Share This Post

मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाला प्राधान्य देत ‘फक्त मराठी वाहिनी’ने सातत्याने नव्यानव्या कथा कल्पनांसाठी आपलं व्यासपीठ खुलं केलेलं आहे. ‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर विविध नवनवे विषय असलेल्या मनोरंजक कार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ या अनोख्या सामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’च्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे. या मालिकेचे दररोज सकाळी ७ :०० वाजता नवे भाग आणि पुनर्प्रेक्षेपित सकाळी ६:०० वाजता प्रसारित होतात. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमाचा शतकोत्सवी भाग सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रेक्षेपण शनिवारी सकाळी ६:०० वाजता प्रसारित होणार आहे. “महाराष्ट्रात अनेक थोर संत महात्म्यानी शेकडो वर्षांपासून कीर्तनाचा आधार घेऊन समाज प्रबोधंनातून परिवर्तन घडवून आणले…

Read More