Entertainment T.V Serials 

‘अंगत पंगत’ खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत कार्यक्रम! १९ एप्रिल दुपारी १:३० वा. ‘फक्त मराठी वाहिनी’वर!

Share This Post

‘फक्त मराठी वाहिनी‘ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील ‘अंगत पंगत‘ या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्रित, गप्पा मारत आपल्या आवडीच्या पदार्थांची निर्मिती, त्यांचा इतिहास, तसेच एकाच घटक पदार्थापासून महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी व विश्वात तयार होणारा पदार्थ कोणता याची रंजक रेसिपी पहायला मिळणार आहे. सर्वांना तृप्त करणाऱ्या वेगवेगळ्या पाककला सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी १:३० वाजता, ‘फक्त मराठी वाहिनी‘वर पाहायला मिळणार आहे. ‘अंगत पंगत‘ या शो मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे, या तिन्ही रेसिपी…

Read More