Entertainment 

सईचा डाव आर्याच्या जिवावर बेतेल का? – ‘आई माझी काळुबाई’, ‘महाएपिसोड’ २८ फेब्रुवारी, संध्या. ७ वा.

Share This Post

सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.  ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. २८ फेब्रुवारीला संध्या. ७ वा. ‘आई माझी काळुबाई’चा महाएपिसोड असणार आहे.  हंबीररावांचा खून ज्या नोकराकरवी विराटनं करवला होता त्या नोकराचा आर्या शोध घेतेय. दरम्यान सई लाख्यासुराची शिष्या झाली आहे आणि तिला काही दिव्य शक्ती मिळाल्या आहेत. तिला मिळालेल्या या शक्तींचा उपयोग करून ती आर्याला हरवण्याचा प्रयत्न करतेय.  हंबीरवांच्या खुन्यापर्यंत आर्या पोचू शकेल का? सईचा डाव आर्याच्या  जिवावर बेतेल का? चांगल्या शक्तीविरुद्ध  वाईट शक्ती अशी लढाई प्रेक्षकांना ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. पाहा, ‘आई माझी काळुबाई’, ‘महाएपिसोड’  २८ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Entertainment T.V Serials 

विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

Share This Post

‘आई माझी काळुबाई’, महाएपिसोड, ७ फेब्रुवारी, रविवारी संध्या. ७ वा.   सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची विशेष चर्चा सातत्यानं होताना दिसते.  ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. येत्या ७ तारखेला आई माझी काळुबाईचा महाएपिसोड आहे. पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे पाहणं खूप उत्कंठावर्धक असेल. पाहा, ‘आई माझी काळुबाई’, महाएपिसोड, ७ फेब्रुवारी, रविवारी संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर

Read More