Uncategorized 

वाढदिवसाच्या दिवशी सोनाली कुलकर्णीचं चाहत्यांना सरप्राइज; साखरपुड्याचे फोटो शेअर

Share This Post

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

पल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी अप्सरा म्हणजेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं. तसेच अनेक दिवसांपासून तिच्या प्रेमप्रकरणाबाबत चर्चाही होत होत्या. नुकताच सोनालीचा वाढदिवस झाला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या आणि प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत तिने आपल्या जोडीदाराविषयी खुलासा केला आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर याच्याशी सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला आहे. याबाबत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वतः फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून यासंदर्भात माहिती दिली. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना सोनालीने लिहिलं आहे की, ‘2 फेब्रुवारी 2020 रोजी आमचा साखरपुडा झाला. आमचा हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजच्या पेक्षा दुसरा दिवस असूच शकत नाही, असं मला वाटतं. तुमचे शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,’ अशी फेसबुक पोस्ट सोनाली कुलकर्णीने केली आहे.’ अशी फेसबुक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नटरंग चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी, ‘अप्सरा आली…’ या लावणीमुळे चाहत्यांमध्ये सोनालीची ओळख अप्सरा म्हणून निर्माण झाली. ‘क्लासमेट्स’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सोनालीने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत सोनालीने स्वतः काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता. त्यावेळी हा विषय फक्त गमतीने चित्रपटाच्या सेटवर घेतला गेला, पण काही फोन आल्यावर ही साधी अफवा नसल्याचं माझ्या लक्षात आलं, असं सोनालीने सांगितलं होतं.

दरम्यान, सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्याशी साखरपुडा केला आहे. दुबई मरिना या ठिकाणी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सोहळा पार पडला. घरच्या घरी पार पडलेल्या या साखरपुडा समारंभासाठी सोनाली आणि कुणाल यांचे कुटुंबिय उपस्थित होते.