Entertainment Lifestyle 

पितृपक्षात कावळ्याला विशेष महत्त्व का असते?

Share This Post

कोरोनाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता योग्य ते अंतर ठेवून घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात झाली आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष पंधरवडा सुरू असून पूर्वजांना      पितृपंधरवड्यात त्यांच्या मृत्यूच्या दिवसाच्या तिथीचा अभ्यास करून पितृपंधरवड्यातील तिथी निवडली जाते. पितरांच्या दिवशी कावळ्याला विशेष महत्त्व असते. हिंदू पुराणांमध्ये कावळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे कावळ्याला देवपुत्र ही मानले जाते. पुराणातील एका आख्यायिकेनुसार देवराज इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वांत प्रथम कावळ्याचे रूप धारण केले व माता सीतेला जखमी केले होते. तेव्हा प्रभू श्रीरामांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंतच्या डोळ्याला क्षतिग्रस्त केले होते. जयंताने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. तेव्हा रामचंद्रांनी त्याला वरदान दिले की, तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून काकस्पर्श,

काकदृष्टी यांना महत्त्व आले व आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला अन्न दिले जाते.

पितर हे यमलोकाहून पृथ्वीवर येतात. पितरांना तृप्त करण्यासाठी हा काळ उपयुक्त आहे असे मानले जाते. गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमराजाचा संदेशवाहक म्हटले आहे. पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात व त्याने पितरांना तृप्ती मिळते. कावळ्याला पितृपक्षात महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडात दिसते. मांजराला उजेडात तसेच अंधारातही दिसते. वटवाघूळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची  दृष्टी कावळ्यास मिळाली आहे, हे महत्त्वपूर्ण आहे.

कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे व सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. जोपर्यंत  हे मन्वन्तर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल, असे श्रीरामानी कावळ्याला वरदान दिले आहे. यासाठी कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही अशी हिंदु धर्माची मान्यता आहे.

पूर्वी पितरांसाठी नातलग, गावातील व्यक्ती, शेजारील व्यक्तींना विशेषकरून बोलविले जात होते, मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. भरमसाठ वृक्षतोड व वाढलेल्या शहरीकरणामुळे पशुपक्ष्यांचे निवारेच नष्ट होत चाललेले आहेत. पर्यायाने अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पितरांप्रति असणारी श्रद्धा आपल्याला हेच सांगत आहे की, पशुपक्ष्यांना जिवंत ठेवा, त्यांना जतन करा, त्यांना जतन करण्यासाठी निवारास्थाने जपा, वाढवा, लागवड करा, संवर्धन करा.

Related posts