Entertainment 

औरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड

Share This Post

आजवर अनेकांनी शिक्षण एक मात्र करिअर दुसऱ्याच क्षेत्रांमध्ये केल्याचे आपण पाहिले असेल. मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये असे कलाकार आहेत की ज्यांचे शिक्षण एक व्यवसाय मात्र दुसराच.

मराठी चित्रपटसृष्टीत सांगायचे झाले तर आपण डॉक्टर व खासदार अमोल कोल्हे यांचे नाव ऐकले असेल. अमोल कोल्हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. मात्र, त्यांचा जीव चित्रपटसृष्टीमध्ये रमला. छोट्या पडद्यावर त्यांची संभाजी महाराजांवरील मालिका प्रचंड गाजली.

याप्रमाणेच डॉक्टर दिलीप प्रभावळकर यांचे नाव देखील आपण ऐकले असेल. मराठी मालिका, चित्रपट व हिंदी चित्रपटात त्यांनी प्रचंड मोठे काम केले आहे. असे अनेकजण आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. 

आज आम्ही आपल्याला अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत की जिने मराठवाड्यासारख्या भागात राहून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करून आता वेगळी वाट निवडली आहे. आज आम्ही आपल्याला

अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

तो काळ होता 1995 चा. मराठवाड्यातून एक मुलगी चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने मुंबईला जाते. त्यानंतर ती काही छोट्या-मोठ्या जाहिरातीमध्ये काम करते. त्यानंतर तिला नाटकांमध्ये देखील काम मिळते. काही दिवसानंतर तिला चित्रपट मिळतो. तो प्रचंड गाजतो. आम्ही बोलत आहोत मूळ औरंगाबादच्या असलेल्या मयुरी कांगो या अभिनेत्री बद्दल.

1995 मध्ये मयुरी कांगो सुरुवातीला नसीम या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. तिचा अभिनय चित्रपट-दिग्दर्शक महेश भट यांना खूप आवडला होता. त्यामुळे 1996 मध्ये महेश भट यांनी मयुरीला माझ्यासोबत चित्रपटात काम करशील का ? अशी विचारणा केली.

त्यानंतर त्यांनी ‘पापा कहते है’ हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटात जुगल हंसराजने भूमिका केली आहे. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही कुछ दूर चलते ही’ हे गाणे एवढे गाजले की राज्यामध्ये घराघरात पोहोचले. त्यावेळी पानपट्टी आणि ठेवल्यावर सर्वाधिक चालणारे हे गीत होते.

त्यानंतर मयुरी परदेशात स्थायिक झाली. त्या काळापासून तिने बॉलिवूडमध्ये काम नाही केले. त्यानंतर तिने सॉफ्टवेअरमध्ये पदवी मिळवली. 2019 मध्ये मयुरीची गुगल इंडिया हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्या नेतृत्वाखाली गुगल इंडिया अतिशय सक्षमपणे काम करत आहे. मयुरीचे वडील डॉक्टर भालचंद्र कांगो सुपरिचित व्यक्ती आहेत.

Related posts