Entertainment Lifestyle 

अधिक महिना काय असतो आणि तो केव्हा लागू होतो?

Share This Post

मराठी कालगणनेनुसार वर्षाचे बाराच महिने असतात, परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो. त्या तेराव्या महिन्याला अधिक मास म्हणतात. मलमास यास पुरुषाेत्तम मास संबाेधले जाते. याविषयी असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने हे नाव दिले. थाेडक्यात मलमास या नावास पुरुषाेत्तम मास देऊन पावित्र्य वाढविले आहे. या वर्षी १८ सप्टेंबर पासून अधिक महिना सुरू होणार असून १६ ऑक्टोबर पर्यंत राहील. ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात, तर मराठी कालगणनेनुसार वर्षाचे ३५४ दिवस असतात. ख्रिश्चन कालगणना चंद्रावर, तर मराठी कालगणना सूर्यावर आधारित असते. ख्रिश्चन कालगणनेत दर तीन वर्षांनी लीप वर्ष असते, तर मराठी कालगणनेच्या दिवसांची तूट भरून काढण्यासाठी दर ३२ महिने १६ दिवसांनी म्हणजेच तीन वर्षांनी येणारा महिना हा अधिक मास ठरवला आहे.

प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला ‘मलमास’ असे सुद्धा म्हणतात. व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात. चैत्र पासून अश्‍विन पर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.

१८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात अधिक मास आहे या मासात नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, दान आदींना अधिक महत्त्व असते. या मासात दान केल्यास अधिक पटींनी फळ मिळत असल्याने अनेक जण अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान करतात. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते.

या मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करतात. अधिक मासात सतत नामस्मरण केल्यास श्री पुरुषोत्तम कृष्ण प्रसन्न होतो असेही लोकांचे म्हणणे आहे. कित्येक लोक अधिक मासात तीर्थक्षेत्र देवदर्शन यांनाही भेटी देतात. त्याच प्रमाणे अधिकमासात देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते असाही लोकांचा समज आहे. हिंदू शास्त्रानुसार या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’ असे नमूद केलेले आहे. अशाप्रकारे हिंदु शास्त्रानुसार अधिकमासाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.