Bollywood 

१२ वर्षात ‘इतकी’ बदलली आहे श्रीकृष्णात बाल कृष्णाची भूमिका साकारणारी ‘ही’ चिमुरडी, पाहून विश्वास बसणार नाही

Share This Post

लॉकडाऊन दरम्यान अनेक पौराणिक मालिकांचं पुन:प्रक्षेपण टीव्हीवर सुरू झालंय. त्यात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण आणि महाभारत या मालिकेने टीआरपीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

यामुळे दूरदर्शनवर ही मालिका संपली असली तरी आता स्टार प्लस वर पुन्हा एकदा रामायण मालिका बघायला मिळणार आहे. तसेच महाभारत ही मालिका पुन्हा एकदा कलर्स वर बघायला मिळणार आहे.

त्यातच जय श्रीकृष्णा पुन्हा एकदा टेलिकास्ट केली जातेय. या मालिकेत बाल कृष्णाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली बाल कलाकार धृति भाटिया आता मोठी झालीय.एक चिमुकली असून तिनं छोट्या पडद्यावर खूप चांगल्या पद्धतीनं कृष्णाची भूमिका साकारली होती. तिचा चेहरा प्रेक्षकांच्या मनात कृष्णा म्हणून घर करून बसलाय. एव्हढ्या कमी वयात खूप मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फॉलोविंग बनविण्यात तिला यश आलं.

टीव्हीवरील बालकलाकार धृति भाटियानं अवघ्या अडीच वर्षाच्या वयात कृष्णाची भूमिका साकारली होती. २००८ साली

आलेली जय श्रीकृष्णा ही मालिका रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांनी बनवली होती. या मालिकेच्या प्रसारणाला आता १२ वर्ष झालेले आहेत. या काळात धृति पण मोठी झालीय. आता तिला ओळखणं कठीण झालंय.


सध्या धृति भाटिया अभिनय जगतापासून दूर आहे आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आहे. धृतिचे वडील गगन भाटिया एक बिझनेसमन आहेत तर आई पूनम भाटिया कोरिओग्राफर आणि अभिनेत्री आहे. धृतिला आपल्या आईसारखं डान्स कोरिओग्राफर व्हायचं आहे. म्हणून ती बऱ्याच काळापासून शास्त्रीय नृत्याचं शिक्षण पण घेतेय.

जय श्रीकृष्णा शिवाय धृतिनं आतापर्यंत डोंट वरी चाचू, इर प्यार को प्यार नाम दूं, माता की चौकी आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलेलं आहे.