Bollywood 

रिअल लाईफ मध्ये खूपच सुंदर दिसते, बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीची आई

Share This Post

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची अभिनेत्री असो वा टीव्ही शोमध्ये काम करणारी अभिनेत्री, त्या सर्वजण आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असतात. आपल्याला दररोज सोशल मीडियावर एकापेक्षा एक सुंदर चेहरे दिसत असतात. आजच्या काळात सोशल मीडिया हे असे माध्यम बनले आहे की जे कोणालाही एका रात्रीत स्टार बनवू शकते. आजकाल सर्वच सुंदर अभिनेत्री त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, ज्यामुळे त्या त्यांच्या चाहत्यांच्यामध्ये चर्चेत असतात.

बॉलिवूडच्या जगामध्ये दररोज काहीतरी नवीन पाहायला आणि ऐकायला मिळत असते. त्याच बरोबर बऱ्याच लोकांना बॉलिवूड चित्रपट पहायला खूप आवडतात. जर तुम्हाला देखील चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही सलमान खानचा सुपरहिट चित्रपट बजरंगी भाईजान नक्कीच पाहिला असेल आणि हा चित्रपट काही लोकांना आत्ता देखील पाहायला आवडतो.कारण हा बॉलीवूडच्या सलमान खानचा चित्रपट आहे. तसे, सलमान खानचा प्रत्येक चित्रपट त्याच्या नावाने हिट ठरतो, तशाच प्रकारे हा चित्रपट देखील खूप हिट ठरला. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त जर एखाद्या पात्राचे नाव दुसर्‍या क्रमांकावर चर्चेत आले असेल तर ते म्हणजे मुन्नी… मुन्नी म्हणजे हर्षिता मल्होत्रा हिने कमी वयामध्ये अतिशय सुंदर अभिनय केला आहे.

भाईजानच्या या चित्रपटामुळे हर्षिता तर प्रसिद्ध झालीच आहे, पण त्याच बरोबर तिची आई देखील प्रसिद्ध झाली आहे. हा सर्व चित्रपटातील विषय आहे पण आज आम्ही तुम्हाला मुन्नीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे फोटो दाखवणार आहोत. मुन्नीची आई खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर (हॉट) दिसते की तुम्ही त्याचा अंदाजही घेऊ शकत नाही. होय… तुम्ही चित्ररपटामध्ये मुन्नीच्या आईला थोड्या जास्त वयाच्या आणि पाकिस्तानी स्टाईल मध्ये पाहिले होते, परंतु जर तुम्ही तिच्या खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिले तर नक्कीच तुम्हाला त्याबद्दल आश्चर्य वाटले.