Bollywood 

भारत पेक्षा अमेरिका माझ्या मुलांसाठी अधिक सुरक्षित आहे ‘; सनी लिओन लॉकडाउनमध्ये अमेरिकेत दिसली

Share This Post

अभिनेत्री सनी लिओनी तिचा पती डॅनिअल वेबर यांनी आपल्या तीन मुलांसह लॉकडाउन काळात भारत सोडून अमेरिकेला जाणं पसंत केलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आपल्या मुलांसाठी अमेरिका अधिक सुरक्षित असल्याचं सांगत सनी लिओनी आणि डॅनिअल वेबरने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

सनी लिओनी आपल्या 3 मुलांसह इन्स्टाग्रामवर फोटो टाकत सोशल मीडियावर यासंदर्भातली माहिती दिली आहे. सनी लिओनीचा पतीन डॅनिअलनेही स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे.कॅलिफोर्निआच्या स्टुडीओ सिटीमधून डॅनिअलने आपण अमेरिकेत सुखरुप पोहचल्याचं सांगितलंय. दोन दिवसांपूर्वी सनी आणि तिचं कुटुंब अमेरिकेत पोहचलंय.

दरम्यान, सनी लिओनी व तिचा पतीन डॅनिअल वेबर हे अमेरिकेचे अधिकृत नागरिक आहेत. 2012 पासून सनी मुंबईत राहत होती.