Bollywood 

भाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास

Share This Post

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्यान कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. आता तिने अशी माहिती शेअर केली आहे की त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक, नेहा कक्कडने ऋषिकेशमध्ये एक अतिशय छान असा बंगला विकत घेतला आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहेत.

ऋषिकेश इथल्या बंगल्याची सुंदर छायाचित्रे शेअर करण्याबरोबरच तिने एक प्रेरणादायी गोष्ट देखील सांगितली आहे. नेहा कक्कर यांच्या बंगल्याचे फोटो आतापर्यंत 17 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. नेहा कक्करने तिच्या नवीन बंगल्याच्या फोटो सोबत जुन्या घराचे फोटोही शेअर केले.तिने कॅप्शनमध्ये लिहिलेः “हा बंगला आम्ही ऋषिकेशमध्ये विकत घेतला आहे आणि यापुढील फोटो माझ्या जुन्या घराचा आहे, जिथे माझा जन्म झाला आणि तेव्हा आमचा संपूर्ण परिवार एका खोलीत राहत होता. या खोलीत आईचा टेबल होता त्यावर आमचे स्वयंपाकघर होते. आणि ही खोली आमची नव्हती आम्ही ती भाड्याने घेतलेली होती. आणि आता त्याच शहरात माझा बंगला बघून मी भावनिक होते.

नेहा कक्कड़ हिने अश्याप्रकारे चाहत्यांसोबत आपली प्रेरणादायक गोष्ट शेअर केली आहे.नेहाने पुढे लिहिले- ‘माझ्या कुटुंबाचे आभार. आई-वडील आणि माता-राणी आणि माझे हितचिंतकह यांचेही. ‘ नेहाच्या या पोस्टवर अनेक स्टार्सही प्रतिक्रिया देत आहेत आणि तिच्या संघर्षमय दिवसांपासून तिच्या प्रसिद्धीचे कौतुक करत आहेत.

खूप थोड्या लोकांना हे माहित असेल की नेहा चित्रपट जगतात येण्यापूर्वी जागरणाच्या कार्यक्रमात आपल्या बहिणी आणि भावासोबत गाणी म्हणायची.’इंडियन आयडॉल’ मध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावल्यानंतर नेहाला यश मिळालं आणि त्यानंतर ती यशाच्या पायर्‍या एक-एक चढत झाली.

‘इंडियन आयडॉल’ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतल्यानंतर नेहाने’ नेहा द रॉक स्टार ‘नावाचा संगीत अल्बम काढला. हा अल्बम 2008 मध्ये आला होता. यानंतर नेहा सिनेमा जगतात काम करू लागली.

या पुढे नेहा आपल्या प्रेक्षकांसाठी काय घेऊन येत आहे ते पाहावे लागेल. आम्ही आशा करतो कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.